CM Uddhav Thackeray

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणाऱ्या शिवसैनिकाचा मृत्यू

2019 मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती

दैनिक गोमन्तक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला होता. एक डिसेंबर पासून तिरुपतीच्या वाटेवर निघाले खरे पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी 2019 मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक सुद्धा केले होता आणि त्याचा सत्कार देखील केला होता.

सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव या दोघांनी रोज 35 किलोमीटर पायी चालत जाऊन 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) पोहोचण्याचे नियोजन होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले. पण रोज तीस-पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकले होते. त्यातच त्यांना ताप आला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे जायचे होते. त्यांच्या मित्राने हे घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होती मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.

घरच्यांनी विनंती केली, मित्रांनीही त्यांना पुढे जाण्यापासून थांबवले. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत घालण्यात आली. परत येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला परत येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर येण्याआधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे निघाले.

अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले. दरम्यान घरची मंडळी आणि मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलला जात नव्हता. अखेर घरच्या मंडळींनी बीडच्या पोलिसात धाव घेतली आणि हरवल्याची नोंद केली.

अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला बीडहून सुमन तोडकर यांचे मित्र मंडळ रायचूरला पोहोचले. सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तोपर्यंत त्याची प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी वडील आणि दोन मुलं आहेत.घरच्यांनी विनंती केली, मित्रांनीही त्यांना पुढे जाण्यापासून थांबवले. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत घालण्यात आली. परत येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला परत येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर येण्याआधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे निघाले.

अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले. दरम्यान घरची मंडळी आणि मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलला जात नव्हता. अखेर घरच्या मंडळींनी बीडच्या (Beed) पोलिसात धाव घेतली आणि हरवल्याची नोंद केली.

अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला बीडहून सुमन तोडकर यांचे मित्र मंडळ रायचूरला पोहोचले. सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तोपर्यंत त्याची प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी वडील आणि दोन मुलं आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT