रत्नागिरी: प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी रत्नागिरी दौरा केला. त्यांचा हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) लाभदायी ठरली आहे. पक्षाच्या मुळावर येणारे रत्नागिरी मधील गट मोडीत काढण्यासाठी त्यांनी कानमंत्र दिला आणि त्यांचा चांगलाच परिणाम दिसून आला.
ऐन दिवाळीमध्ये (Diwali) रत्नागिरी (Ratnagiri) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गटातीमध्ये तिलांजली देत पक्षवाढीसाठी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या पालिका निवडणुकीत जोमाने काम सुरु असून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करण्यासाठी निर्धार सर्वांनी मिळून यावेळी केला.
रत्नागिरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून (election) राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागलेली दिसून येते. उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह अनेक पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते शिवसेनेत गेले.
येथून पक्षाची घडी विस्कटलेली आहे. त्यातच काही पक्ष निष्ठावंतांनी एकत्र येऊन पुन्हा पक्ष बांधणीची सुरुवात करत प्रयत्न केले मात्र त्यास अपेक्षित यश आलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप बोरकर यांची निवड यावेळी करण्यात आली. तालुका पदाधिकाऱ्यांची निवडणूक करून त्यांना पत्र देण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, प्रदेश प्रतिनिधी बशिर मुर्तुझा, बाप्पा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, माजी तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुदेश मयेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, बाप्पा सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.