State nurses union
State nurses union Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील परिचारिकांच्या 4500 रिक्त पदांपैकी 1749 बाहेरून भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. याचा परिणाम म्हणून राज्यातील परिचारिकांना कमी मोबदल्यात आणि पदोन्नतीशिवाय समाधान मानावे लागणार आहे.म्हणून या निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील नर्सिंग स्टाफ आणि नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने ही कामावर बहिष्कार टाकला आहे. ( State nurses' union warns of indefinite strike )

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट नर्सेस असोसिएशनच्या संपामागे सरकारने केलेली घोषणा आहे, या घोषणेअंतर्गत काही नर्सिंग स्टाफला बाहेरील एजन्सीकडे आउटसोर्स करण्यास सांगितले आहे. वास्तविक, 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील परिचारिकांच्या 4500 रिक्त पदांपैकी 1749 बाहेरून भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी नर्सिंग कर्मचारी संपावर गेले आहेत.

तर गुरुवार व शुक्रवारी पूर्णत: संपावर जाणार

या संदर्भात नर्सेस असोसिएशनने म्हटल आहे की, त्यांनी आता फक्त एक तास काम करणे बंद केले होते, पुढील दोन दिवस ते असेच काम करतील. यानंतरही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरुवार व शुक्रवारी पूर्णत: संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत योग्य उत्तर न मिळाल्यास 25 हजार सदस्यीय संघटनेने काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

आता महामारीची वेळ नाही ज्यामूळे सरकारला मोठ्या संख्येने परिचारिकांची भरती करावी लागेल, म्हणून ते त्यांचे आउटसोर्सिंग करत आहेत. यासोबतच राज्यातील परिचारिकांना कमी मोबदल्यात आणि पदोन्नतीशिवाय समाधान मानावे लागणार आहे. आत्तापर्यंत परिचारिकांच्या नियुक्त्या झाल्या, त्याच पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT