MSRTC Bus Service Dainik Gomantak
महाराष्ट्र

...अखेर सिंधुदुर्गातील 'लालपरी' गोव्याकडे रवाना

परिवहन मत्र्यांच्या (Transport Minister of Maharashtra) आवाहनाला साथ देत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बससेवा (MSRTC Bus) सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

MSRTC Bus Strike : एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी 8 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर एसटी (MSRTC Bus) कर्मचाऱ्यांनी विनामुदत संप (Workers Strike) पुकारला होता. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. यासाठी कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणीनुसार वेतनवाढ देण्याचे आश्वासनही त्यांनी केले होते; तरीही कर्मचारी संपावर अडूनच होते.

पण काही दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यातून तुरळक वाहतूक सुरू झाली आहे. यातच परिवहन मत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सिंधुदुर्ग विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन सुधारित वेतन श्रेणी प्रमाणे देण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून संपानंतर पहिली एसटी धावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ते सावंतवाडी (Kankavali to Sawantwadi) अशी बससेवा काल दुपारी दोन वाजल्यानंतर सुरू केली होती.

आज दुपारी बारानंतर कणकवली ते फोंडा (Kankavali to Ponda) अशी बस सोडण्यात आली आहे. प्रवाशी जरी तुरळक असले, तरी बससेवा सुरू झाल्याने आता हळूहळू संपूर्ण एसटी वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT