Mumbai Municipal Corporation Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धुमधडाका लवकरच

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची खलबते वाढली

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात राणा दाम्पत्याने यांनी हनुमान चालीसेचे मातोश्रीवर पठण करणार असे म्हटल्यावर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला धडा शिकवण्याची घोषणा करत घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावर बरेच दिवस महाराष्ट्रात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. यानंतर आता राजकिय स्तरावर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडतीलच फक्त याला निमित्त यापुढे असणार आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणूकीचं. (Soon Mumbai Municipal Corporation elections are in full swing)

मुंबई महानगरपालिकेला राज्य निवडणूक आयोगाने 31 मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठीची सुविधा मुंबईतील 24 प्रभागांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा धुमधडाका आता काहीच दिवसात सुरु होणार आहे.

येत्या 31 मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेवर सूचना आणि हरकतींसाठी येत्या 6 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते.

किमान 2 महिने लागण्याची शक्यता

आरक्षण सोडतीची प्रक्रिया, मतदार यादी तयार करणे, त्यावर हरकती आणि सूचना नोंदविणे. मतदार यादीत सुधारून करणे, तक्रारींचे निरसन करणे आदी प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागणार आहेत. या सर्व प्रक्रियेला किमान 2 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. येत्या सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून ऑक्टोबरमध्ये निवडणूकीचा धुमधडाका सुरू होणार आहे.

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपल्या भेटी - गाटी वाढवल्या

आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी आता बोर्ड वार्डात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच आरक्षण सोडतीत काही बदल झाल्यास, त्यावर पर्यायही पक्षांतर्गत उभे करण्यासाठी चाचपणी जोरदार सुरु आहे. प्रत्येक इच्छुकांचे लक्ष हे आरक्षण सोडततीवर लागलेले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आपल्या वार्डसह शेजारील वॉर्डात भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षातील संभाव्य उमेदवार, जोरदार तयारी आगामी निवडणुकांसाठी करताना मुंबईत पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT