Sindhudurgm Malvan Chipi Airport Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg Chipi Airport: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'नाईट लँडिंग'ची मंजुरी! आता 24 तास विमानसेवा शक्य

Sindhudurgm Malvan Chipi Airport: कोकणच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग: कोकणच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चिपी विमानतळाला आयएफआर (IFR - Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्ससाठी हिरवा कंदील दिला आहे. या मंजुरीमुळे आता या विमानतळावर रात्रंदिवस आणि कोणत्याही ऋतूमध्ये सुरक्षित विमान उतरवणे शक्य होणार आहे.

राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

चिपी विमानतळावर 'नाईट लँडिंग'ची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारा अद्ययावत विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले.

विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीमुळे वीज पुरवठ्याचे काम वेळेत पूर्ण झाले आणि आज डीजीसीएने अंतिम मंजुरी दिली आहे.

केवळ नाईट लँडिंगच नव्हे, तर विमानतळाच्या विस्तारीकरणावरही भर देण्यात आला आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता आता ३ वरून थेट ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे कार्यक्षमता दुप्पट झाली आहे.

डिसेंबर महिन्यात तब्बल ११,००० प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे. या जबरदस्त आकडेवारीमुळे चिपी विमानतळ लवकरच देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पर्यटनाला चालना

लवकरच मुंबई-सिंधुदुर्ग थेट विमानसेवा नियमितपणे सुरू होणार आहे. २४ तास विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा थेट फायदा कोकणातील पर्यटन व्यवसायाला आणि स्थानिक होमस्टे मालकांना होईल. विशेषतः कोकणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक आता थेट सिंधुदुर्गात उतरू शकतील. या सुविधांमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MGNREGA Renaming: गोवा सरकारचा मोठा निर्णय! मनरेगाचं बदललं नाव, आता ‘या’ नावानं ओळखली जाणार योजना; वर्षाला मिळणार 125 दिवस काम

पुण्यातून गोव्यात पर्यटनासाठी गेला, ओव्हरटेक करण्याचा मोह भोवला; उत्तरप्रदेशच्या तरुणाने अपघातात जीव गमावला

गोव्यात ‘आप’मधून गळती सुरुच, युवा आघाडीच्या नेत्यांचाही पक्षाला रामराम; ‘रिमोट कंट्रोल पॉलिटिक्स’वरुन काँग्रेसच्या केजरीवालांना कानपिचक्या

निकोलस मादुरोंच्या अटकेचे पडसाद! अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर मध्यरात्री हल्ला; वॉशिंग्टनमध्ये तणावाची स्थिती Watch Video

VIDEO: खांद्यावर हात ठेवला नंतर... अ‍ॅशेसमध्ये मोठा राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT