Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

दुकानांवरील पाट्या मराठीतच: मंत्रीमंडळाचा निर्णय

मराठी - देवनागरी लिपितील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती सुध्दा मंजूर करण्यात आली

दैनिक गोमन्तक

राज्यात मराठी वाढवा ही मोहीम सुरू असतांनाच राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला.काही दिवसांपूर्वी सर्व दुकांनावरील नावाच्या पाट्या या मराठीतच असाव्या या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता. परंतू हा निर्णय अनेकांनी गांभिर्याने घेतला नव्हता. परंतू सरकारने आता या संदर्भात कडक निर्णय घेतला आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही केली होती. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या.

त्या संदर्भात राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेऊन कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र (maharashtra)दुकाने न आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

दुकानांच्या पाट्याची नावे अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात तर मराठीत लहान अक्षरात असायची. त्यामुळे आज मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयात मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. तसेच मराठी - देवनागरी लिपितील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती सुध्दा मंजूर करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT