राज्याच्या युती सरकार मध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्वाचा राग आवळला आहे. हा दावा करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी याआधीच सांगितलं होत की "हिंदूंनी आपल्या धर्माच्या आधारेच मतदान केलं पाहिजे " शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधताना शिवसेनेची हिंदुत्वाची बांधिलकी केवळ राजकारण आणि निवडणुकांपुरती मर्यादित नाही तर लोकांना रोटी, कपडा आणि घर मिळावे यासाठी आहे.(Shivsena's Hindutva is not limited to temples only says Sanjay Raut )
काल प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. " आज हिंदुत्वाला आपला मतदार म्हणणारे अयोध्येत बाबरी विध्वंस होत असताना पळून गेले होते. पण जे ठाम होते ते शिववसैनिक होते आणि हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले बाळासाहेब ठाकरे होते."तत्पूर्वी राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत-महंतांनी 'हिंदू व्होट बँक' विकसित केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. त्याचबरोबर पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर कळस रचला असे विधान देखील केले होते.
संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली की नाही हे मला स्वतःला माहीत नाही? मात्र, शिवरायांनी देशात "हिंदी स्वराज्य" स्थापन केले, ही वस्तुस्थिती आहे.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या आधी वीर सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे पालन करणारे होते, म्हणूनच देशातील जनता ठाकरेंना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणते.
ते पुढे म्हणाले, “आमचे हिंदुत्व केवळ राजकारण आणि निवडणुकांसाठी नाही. ते केवळ मंदिरांपुरते मर्यादित नाही. लोकांना रोटी, कपडा आणि मकान हे आमचे हिंदुत्व आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाचा निषेध केल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना नेत्याचे हे वक्तव्य आले आहे हे विशेष. राहुल गांधींनी नुकतेच राजस्थानच्या सभेत सांगितले होते की, "हिंदुत्ववादी" सत्तेचे लोभी आहेत आणि त्यांना कोणत्याही किंमतीत ते मिळवायचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.