Shivsena
Shivsena Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shivsena: शिवसेनेचा अध्यक्ष कोण? विकिपीडिया म्हणते... ट्विटरनेही गायब केली निशाणी

Pramod Yadav

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालात शिवसेना पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे गेले आहे. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह आता उद्धव ठाकरे यांना वापरता येणार नाही. दरम्यान, या निकालाला उद्धव ठाकरे आव्हान देणार आहेत.

दरम्यान, या निकालाची दखल ऑनलाईन माध्यमांनी देखील घेतली आहे. आणि महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे गटाने शिवसेना ट्विटर हँडलचे नाव @ShivSena वरून @ShivSenaUBT_ असे बदलले आहे. नाव बदलून ते ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray असे करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे त्यांनी ब्ल्यु टिक गमावली आहे. शिवसेनेचे हे ट्विटर हँडल 2011 साली उघडण्यात आले असून, त्यांचे 849.9 हजार फॉलवर्स आहेत.

एवढेच नव्हे तर पक्षाचे ट्विटरवर असलेले @ShivsenaComms या हँडलचे नाव बदलून @ShivsenaUBTComm असे करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची देखील ब्ल्यु टिक गायब झाली आहे.

Shivsena

विशेष म्हणजे शिवसेनेच्या विकिपीडिया पेजवरही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे अध्यक्षपद महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर, खासदार राहुल शेवाळे हे लोकसभेतील पक्षनेते म्हणून दाखवले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मात्र शिवसेनेचे पूर्वीचे नेते असा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाचे असणारे @OfficeofUT, Office of Uddhav Thackeray हे हँडलचे मागील काही दिवसांत फॉलवर्स वाढले आहेत. त्यांचे सध्या सोळा लाख फॉलवर्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT