महाराष्ट्र

Shivsena Sambhaji Brigade: शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ, युतीची घोषणा

लवकरच एकत्र घेणार महामेळावा

गोमन्तक डिजिटल टीम

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने एकत्र येण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी एकत्रित ही घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका एकत्र लढणार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिलीच संघटना शिवसेनेसोबत आली आहे. त्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले आहे.

"देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो." असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणित विषमतावादी विचारांना सर्वशक्तीनिशी कार्यपद्धतीनं विरोध केला. संभाजी ब्रिगेड देखील लोकहित आणि महाराष्ट्राचं हित याच पार्श्वभूमीवर काम करत आहे. आम्ही एकत्र आलो आहोत. लवकरच एक महामेळावा घेतला जाईल."

महाराष्ट्रात आगामी स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही युती महत्वाची ठरणार आहे. तसेच, शिवसेनेत पडलेले दोन गट पाहता शिवसेनेला देखील बळ मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ही राजकीय घडामोड महत्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT