शिवसेना पक्षाचे चिन्ह Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: पक्षनिष्ठ नेत्यांना संपवण्यासाठी भाजपचा डाव: शिवसेना

भाजपने (BJP) जुन्या पक्षनिष्ठांना डावलुन आयारामांना संधी दिल्याचे पहायला मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री मंडळामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांचा समावेश करणे म्हणजे पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा फेरबदल केला आणि राज्यसभेच्या पहिल्याच टर्म मध्ये कराड यांना अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. (Shivsena alleges that BJP ignored Pankaja Munde)

प्रीतम मुंडे यांना नवीन मंत्रीमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र तसे झाले नाही. "भागवत कराड यांना राज्यमंत्री करणे हा पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायेखाली कराड वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आले. वंजारा समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हे केले गेले आहे का? " असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये उपस्थित केला गेला आहे.

दरम्यान, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा मंत्रीमंडळात समावेश करणे म्हणजे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ शिंपडण्यासारखे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. पवार आणि पाटील दोघांनीही नुकतीच राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला असुन ते मूळचे भाजपाचे नसुन सुद्धा मंत्रीपद मिळाल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Professional League 2024: जीनो क्लबचा पाचवा विजय! कुठ्ठाळी व्हिलेजर्सला नमवून पटकावले अग्रस्थान

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Ranji Trophy 2024: गोव्याच्या फलंदाजांची आतिषबाजी! 'स्नेहल'चे दुसरे द्विशतक; मिझोराम संकटात

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

SCROLL FOR NEXT