Sanjay Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी शिवसेनेच्या संजय पवारांना उमेदवारी; राजेंच काय?

शिवसेनेने आपला उमेदवार देखील ठरवला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण सुरू असताना शिवसेनेने (Shivsena) आपला उमेदवार ठरवला असल्याची चर्चा रंगत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची आधी चर्चा रंगत होती. मात्र संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याचे दिसून येत आहे. तर शिवसेनेने आपला उमेदवार देखील ठरवला आहे. (Shiv Sena Sanjay Pawar candidature for Rajya Sabha)

कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) यांचे नाव राज्यसभेसाठी समोर आले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह संजय पवार यांचे नाव सध्या चर्चिले असल्याचे सांगण्यात येत आहे. कालपर्यंत संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरूच होती. दुपारी बारावाजेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, असे सांगण्यात आले होते, मात्र संभाजीराजे अपक्ष लढण्यावरच ठाम आहेत.

कोण आहेत संजय पवार?

शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून कोल्हापुरमध्ये (Kolhapur) संजय पवार यांना ओळखले जाते. मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेमध्ये काम केले आहे. ते सध्या जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत. तर संजय पवार मूळ ग्रामीण भागातील आहेत. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे देखील शिवसेनेने ठरवले आहे.

एकीकडे संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत, तर त्यांना शह देण्यासाठी सर्वांशी संवाद असलेला उमेदवार शिवसेनेला सध्या हवा आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा सध्या प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळू शकतो आहे.

संभाजीराजेंचा काय निर्णय?

संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला असे दिसते आहे. अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपाची (BJP) मते घेऊन राज्यसभेवर जाण्याचे त्यांचे गणितच होते. छत्रपतींच्या घराण्यातील असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे राज्यसभेचा मार्ग सोपा होणार आहे, असे संभाजीराजेंना वाटत होते.

मात्र, शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातल्याने संभाजी राजेंच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेचा हा निर्णय भाजपाच्याच पथ्यावर पडताना दिसून येत आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शेवटच्या क्षणी भाजपा संभाजीराजेंना पाठिंबा देईल, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT