महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीशी नवाब मलिकांचे संबंध होते, हा मुद्दा न्यायालयानेही मान्य केला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये नवाब मलिक यांनी गोवाला कंपाऊंडची जमीन घेण्याचा कट रचल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. (The ED has clarified the connection of Nawab Malik with D Company)
हसीना पारकर (Haseena Parkar) यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा भेटी घेतल्या आणि मनी लाँड्रिंग देखील केले आहे. या न्यायालयीन कारवाईनंतर मलिक यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मलिक यांनी हसिना पारकर, सरदार शाहवली खान यांची भेट घेतल्याचा देखील आरोप ईडीने केला आहे. सलीम पटेल, हसिना पारकर, सरदार शाहवली खान यांच्या संपर्कात असल्याचा देखील आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मलिकने दाऊद टोळीशी संबंध ठेवून गोवाला कंपाउंडची जागा आपल्या ताब्यात घेतली होती.
नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) फेब्रुवारीमध्ये आपल्या अटकेत घेतले आहे. त्यावेळी कोर्टात उलटतपासणी सुरू असताना ईडीने मलिकांवर अंडरवर्ल्ड आणि टेरर फंडिंगशी संबंध असल्याचा देखील आरोप केला होता. त्यानंतर नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीच्या कार्यकर्त्यांशी संबंध असल्याचे ईडीने न्यायालयाला स्पष्ट केले. तसेच त्यांचा हवाल्यासारख्या बेकायदेशीर कामात थेट संबंध असल्याचे ही सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ईडीने यावेळी म्हटले होते. त्यामुळे नवाब मलिक यांची कोठडी देण्यात यावी, त्यानंतरच मलिक आणि अंडरवर्ल्डमधील त्यांचे संबंध उघड होतील.
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत नवाब मलिकांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तर न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देताना स्पष्ट सांगितले आहे की, ते मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांना ही सवलत दिली होती. नवाब मलिक किडनीच्या समस्येने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे, तर त्यांना उपचारासाठी कुर्ल्यातील रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.