Goa News Dainik Gomantak
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्या एन्ट्री अगोदरच गोवा पोलीस सतर्क

बंडखोर नेत्यांचा ताफा गोवाच्या दिशेने रवाना

दैनिक गोमन्तक

आसाम येथे गेले चार ते पाच दिवस तळ ठोकून असलेला शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचा ताफा आता गोव्याच्या दिशेने निघाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा येथील दोना पावला येथील हॉटेल ताज कन्वेन्शन या ठीकाणी येत्या काही तासातच पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल ताज कन्वेन्शन येथे पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्यामूळे या हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी पोलीसांनी सुरु केली आहे.

आज दोना पावला येथील हॉटेल ताजमध्ये महाराष्ट राज्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार येणार आहेत त्यामूळे हॉटेलच्या गेट बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार दिपक केसरकर यांच्याशी गोमन्तक प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही सर्वांनी वारंवार राष्ट्रवादी आणि भाजप सोबतची युती तोडूयात अशी विनंती केली. पण पण ते ऐकण्यास तयार नाहीत.

हॉटेल ताज कन्वेन्शन या ठीकाणी पोलीस बंदोबस्त तैनात

आम्ही आमची भुमिका ऐका अशी विनंती ही केली मात्र ते ऐकायला तयारच नाहीत असे केसरकर यावेळी म्हणाले. त्यामूळे आता आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडाणार हे अटळ आहे. आणि याचे पहिले पाऊल म्हणजे आम्ही आता गुहावटी सोडली आहे. आणि गोव्याच्या दिशेने निघाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT