Yogesh shevale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shiv sena: शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार

Divorce: बायको सोबत घटस्फोट घेणार असून त्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार आहे

दैनिक गोमन्तक

Shiv sena: खासदार आणि लोकसभेतील नवे गटनेते राहुल शेवाळे यांच्याविरोधात कापडाचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने बलात्काराची तक्रार (FIR)नोंदवण्याची मागणी केली आहे. शेवाळे हे 2020 पासून भावनिक आणि मानसिक शोषण आणि बलात्कार करत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तर दुसरीकडे, शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांनी पतीवरील आरोप फेटाळून लावले आणि 25 वर्षांहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या खासदाराची प्रतिमा मलीन करण्याचा हा मुद्दाम षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

पत्नीसोबतचे पटत नसल्याचे सांगत शेवाळे याने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीनुसार, शेवाळे याने महिलेला सांगितले होते की, लवकरच मी बायको सोबत घटस्फोट घेणार असून त्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार आहे.

महिलेने सांगीतल की मी दुबईहून यायचे तेव्हा खासदार मला दिल्लीतील एमपी हाऊसमध्ये जेवायला बोलवायचे. ऑक्टोबर 2021 मध्ये, मी इन्स्टाग्रामवर माझा आणि शेवाळे यांचा एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला होता, त्यानंतर त्यांनी माझ्याविरुद्ध शारजहानमध्ये तक्रार (FIR) दाखल केला आणि मला अटक करण्यात आली. मी 78 दिवस तुरुंगात घालवले पण नंतर निर्दोष सुटले.

मुंबईत आलेल्या महिलेने दावा केला की, तिने या वर्षी एप्रिलमध्ये साकीनाका पोलिस ठाण्यात शेवाळे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, परंतु पुढील कारवाई झाली नाही. महिलेने सांगितले की,मला समजल की साकीनाका पोलिसांनी शेवाळे यांच्या तक्रारीवरून माझ्याविरुद्ध खंडणी व इतर कलमांखाली तक्ररार (FIR) नोंदवला आहे.

मी पोलिसांना सर्व पुरावे दिले आणि राष्ट्रीय महिला आयोगात ही तक्रार केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी शेवाळे यांच्यावर कारवाई करावी आणि पोलिसांना त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे निर्देश द्यावेत.

या घटने वर कामिनी शेवाळे म्हणाल्या, ही महिला गेल्या काही महिन्यांपासून मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होती. शारजाहमध्ये काही महिन्यांपूर्वी एका प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने धमकावल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करण्यात आला होता आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. सुमारे 80 दिवस महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तिचा भाऊ एका महिलेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी दिल्लीच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा हा हेतुपुरस्सर षडयंत्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT