Vinayak Mete Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident: शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

या अपघातात मेटे गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचं आज अपघाती निधन झालं.

दैनिक गोमन्तक

Vinayak Mete Death: शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात मेटे गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचं आज अपघाती निधन झालं. या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अपयश आले आणि त्यांनी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्यात हा अपघात झाला होता.

आज पहाटे मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. तब्बल एक तास त्यांनी मदतीसीठी प्रयत्न केला मात्र त्यांच्यापर्यंत मदत पोहचली नाही. आणि त्यानंतर कार चालकाच्या मदतीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी मेटे यांना मृत घोषीत केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील माडप बोगद्यामध्ये हा अपघात झाला. माजी आमदार त्यांच्या एसयूव्ही कारमधून जात होते. यादरम्यान अपघात झाला, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माजी आमदार बीडहून मुंबईला जात होते. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही हॉस्पिटलला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. विनायक मेटे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे समर्थक होते. मेटे हे मराठा समाजासाठी काम करण्यासाठी ओळखले जात होते, त्यांच्या निधनाने या समाजाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT