sharad pawar statement on ketaki chitale facebook post Danik Gomantak
महाराष्ट्र

केतकी चितळेला अटक करताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला घेतलं ताब्यात

दैनिक गोमन्तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शरद पवार यांचे वय, शारीरिक व्याधी यावरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिच्यावर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आता, ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. यावर पवार म्हणाले ''मला त्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मला व्यक्तीही माहित नाही आणि तुम्ही काय सांगताय हे देखील माहित नाही. नक्की काय बोलल्या आहेत हे माहिती झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही.'' (sharad pawar statement on ketaki chitale facebook post)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियातून केतकी चितळेला ट्रोलही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकी ती पोस्ट काय?

अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसकूस पोस्टमध्ये लिहिलंय की..

तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड ||

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT