Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

महिला आरक्षणावर काय म्हणाले शरद पवार, वाचा सविस्तर

महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्यासाठी उत्तर भारत आणि संसदेची मानसिकता अजूनही अनुकूल नाही, असे पवार यांनी म्हटले

दैनिक गोमन्तक

Sharad Pawar on Women Reservation: महाराष्ट्रातील नेते उत्तर भारताबाबत अनेकदा मोठ मोठे विधाने करतात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विधान समोर आले आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्यासाठी उत्तर भारत आणि संसदेची मानसिकता अजूनही अनुकूल नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी पुण्यात डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला त्यांची कन्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे उद्दिष्ट असलेल्या महिला आरक्षण विधेयकावरील प्रश्नाला शरद पवार उत्तर देत होते. हे विधेयक संसदेत मंजूर होणे बाकी आहे. काँग्रेसचे लोकसभेचे सदस्य असल्यापासून ते संसदेत या विषयावर बोलत असल्याचे शरद पवार म्हणाले.

"महिला आरक्षण विधेयकाबाबत संसदेची मानसिकता विशेषत: उत्तर भारतात अनुकूल राहिलेली नाही. मला आठवते, मी काँग्रेसचा लोकसभा सदस्य असताना, मी काँग्रेसमध्ये सहभागी होतो. संसदेत महिला आरक्षणाचा मुद्दा पण बोलायचो. माझं भाषण संपल्यावर मी मागे वळून पाहिलं तर माझ्या पक्षाचे बहुतेक खासदार उठून निघून गेलेले असायचे म्हणजे माझ्या पक्षाच्या लोकांनाही ते पचनी पडलं नाही. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्नशील राहावे," असेही पवार यावेळी म्हणाले.

"मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यात आले होते. सुरुवातीला विरोध झाला, पण नंतर लोकांनी तो स्वीकारला," अशी माहितीही शरद पवार यांनी काल पुण्यात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT