राज्यात 2024 च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीचे (MahaVikas Aghadi) निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात भाजपला (BJP) पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी यावेळी केले. विधिमंडळातही भाजपला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी दोन बैठका झाल्या आहेत. सकाळी महाविकास आघाडीचे तरुण आमदार पवार यांना भेटले व सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांनी बैठक पार पडली. (Sharad Pawar has said that he will not allow BJP to come to Maharashtra again)
पवार यांना भेटणाऱ्या आमदारांमध्ये रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांचा देखील समावेश होता. जवळपास दोन तास ही बैठक चालली होती. यावेळी पवारांनी युवा आमदारांची मते जाणून घेतली आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी कानमंत्रही दिला. ‘भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून खुप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. (Sharad Pawar News Updates)
आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सर्वांना सांगितले. विशेष म्हणजे, गुरुवारीच सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना गोव्यानंतर (Goa) महाराष्ट्र काबीज करण्याची घोषणा केली होती.
विधिमंडळातही आक्रमक उत्तर,
सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमकपणे उत्तरे देण्याचा निर्णय झाला आहे. मलिक यांच्याकडे दोन जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद आहे. गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनुपरे यांच्याकडे तर परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मलिक यांच्याकडील कौशल्य विकास खाते राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक खाते हे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे दिले जाणार आहे. फडणवीस यांनी 2024 नंतर सत्तेत येऊ, असे सांगितले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे सरकार 2024 पर्यंत राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.