Seema Haider-Sachin Love Story Dainik Gomantak
महाराष्ट्र

Seema Haider Love Story: 'सीमा हैदर परत आली नाही तर 26/11 सारखी...', मुंबई पोलिसांना धमकी

Seema Haider Love Story: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे.

Manish Jadhav

Seema Haider Love Story: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्‍याने उर्दूमध्ये म्हटले आहे की, सीमा हैदर पाकिस्तानात परत न आल्यास भारत उद्ध्वस्त होईल.

कॉलरने मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करुन 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली. हा कॉल 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दरम्यान, सचिन मीना या तरुणासोबत सीमा ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असताना दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर सीमाने सचिनसोबत अवैधरित्या भारतात प्रवेश केला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेतले. यानंतर न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

दुसरीकडे, सचिनसाठी तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. सीमा तुळशीची पूजा करते. तिने गळ्यात राधे-राधेचा गमछाही घातला आहे. सचिनसाठी सीमा शाकाहारी झाली आहे. तिने आपला आवडता पदार्थ चिकन बिर्याणी देखील सोडली आहे. सीमाला परत जायचे नाही. पाकिस्तानात (Pakistan) गेल्यास तिला मारले जाईल, असे तिचे म्हणणे आहे.

तसेच, सीमा हैदरला तिचा पहिला पती गुलाम हैदरपासून घटस्फोट घ्यायचा आहे. सीमाने माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'मी गुलाम म्हणून जगू शकत नाही. त्याहून जास्त प्रेम मला इथे मिळत आहे. सचिनच्या कुटुंबाचाही मला पाठिंबा आहे. माझ्या चार मुलांचीही चांगली काळजी घेतली जात आहे.'

दुसरीकडे, या सगळ्यामध्ये सीमा हैदरवर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोपही केला जात आहे. जरी तिने ते आरोप नाकारले आहेत. असे काही नसल्याचे तिने सांगितले. हे खरे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आले असते, असेही ती पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पाऊस थांबला, उकाडा वाढला! दमट हवामानाने नागरिक त्रस्त; तुरळक सरी कोसळण्याची शक्यता

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT