Saying I love you is expression of love not crime mumbai special court Dainik Gomantak
महाराष्ट्र

'I LOVE YOU' म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम; तो गुन्हा नाही

Mumbai Special Court 23 वर्षीय तरुणाला POCSO 2012 नुसार निर्दोष मुक्त केले आहे

दैनिक गोमन्तक

मुंबईतील विशेष न्यायालयाने (Mumbai Court) एका 23 वर्षीय तरुणाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट (POCSO) 2012 नुसार निर्दोष मुक्त केले आहे, त्याने एका मुलीला एकदा आय लव्ह यू (I Love You) म्हटले होते. आय लव्ह यू म्हणणे म्हणजे जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीच्या नम्रतेचा अपमान करणे नाही. तर हे वाक्य आपलं प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. कुणाकडे आपलं प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा नाही.

प्रेम व्यक्त केलं म्हणून न्यायालयात गेला खटला

विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी मंगळवारी ही टिप्पणी करताना आपला निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी न्यायालयाचा सविस्तर आदेश बुधवारी जाहीर झाला. 17 वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2016 मध्ये आरोपीने आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली होती.

आय लव्ह यु म्हटले म्हणून...

आरोपीने मुलीकडे रोखून बघून तिच्या डोळ्यात डोळे घालून मुलाला आय लव्ह यु म्हटले आणि तिच्या आईला धमकावल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे वडाळा टीटी पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO कायद्याच्या (POCSO ACT, 2012) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशा पुराव्याअभावी सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.

कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटले?

कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “पीडितेच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने तिला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे सांगितले होते. या प्रकरणामध्ये आरोपीने वारंवार पीडितेचा पाठलाग केला किंवा तिला त्रास दिला, असे काहीही झाले नाही. त्याने फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढेच सांगितले.आणि असे बोलणे म्हणजे पीडितेप्रती आरोपीने आपले प्रेम व्यक्त केले असा होतो. त्यामुळे पीडितेच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले असे म्हणता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT