Sawantwadi Beef Smuggling Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sawantwadi Beef Smuggling: आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त

Beef Smuggling: सावंतवाडी जिल्ह्यातील बाहेरचावाडा परिसरातून पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल ८० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.

Sameer Amunekar

सावंतवाडी: शहरातील बाहेरचावाडा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून ८० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५) आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा (वय ४०) अशी आहेत.

सावंतवाडी पोलिसांना ही माहिती गोपनीय स्रोतांकडून मिळालेली होती. यानुसार, पोलिसांनी बाहेरचावाडा येथील त्या घरात धाड टाकून संशयित दाम्पत्याला ताब्यात घेतले. घरात तपासणी करताना पोलिसांना विरोध केला गेला.

दरवाजे उघडले नसल्यामुळे पोलिसांनी जीपवरील अनाउन्सर सिस्टीमद्वारे सूचना दिल्या आणि घरातील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सहकार्य न केल्यास खिडक्या फोडून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

घरातील संशयित सनोबरने हातात कैची घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि आत प्रवेश केल्यास आत्महत्येची धमकी दिली. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासणीत घरातील फ्रीजमध्ये ८० किलो गोमांस आढळले.

या कारवाईत पोलिसांनी ८० किलो गोमांस, एक मोठा फ्रीझर, वजनकाटा, मांस कापण्याचा चाकू, प्लास्टिक पिशव्या सावंतवाडी पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curti Khandepar: फोंडा मतदारसंघाचा 50% भाग व्यापणारी 'कुर्टी - खांडेपार' पंचायत! झेडपी आरक्षण; आशा, निराशा व समीकरणे

Palolem Beach: पाळोळे किनाऱ्यावर वाद पेटला! पर्यटक बोटमालकांच्या 2 गटांत वितुष्ट; समझोत्यानंतरही धुसफूस सुरुच

India A vs SA: सिराज, कुलदीप, प्रसिध कृष्णा फेल! भारतीय गोलंदाजांचा 'फ्लॉप शो'; दक्षिण आफ्रिका संघाचा 417 धावांचा पाठलाग

Goa opinion: लडाखने जे करून दाखवले ते गोव्याला जमेल?

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT