Sawantwadi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sawantwadi: सावंतवाडीत सात दुकाने फोडली, कणकवली पाठोपाठ धुडगूस; पोलिस यंत्रणेसमोर आव्हान

कणकवलीनंतर चोरट्यांनी सावंतवाडी शहरात मध्यरात्री धुमाकूळ घातला. पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सात दुकाने फोडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

सावंतवाडी: कणकवलीनंतर चोरट्यांनी सावंतवाडी शहरात मध्यरात्री धुमाकूळ घातला. पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सात दुकाने फोडली. या चोरीमध्ये दोन दुकानांमधून चार हजार रुपयांची किरकोळ रक्कम चोरीस गेली असून, चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. हा प्रकार रविवारी पहाटे सातच्या सुमारास उघडकीस आला.

कणकवली शहरात चोरट्यांनी दुकानांना लक्ष्य केल्यानंतर अशाच प्रकारे चोरीचे प्रकार रविवारी सावंतवाडीत घडला. शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याचा फायदा घेत अनोळखींनी हा चोरीचा प्रकार केला. मात्र, काही खासगी सीसीटीव्हीत चोरटे दुकानाचे शटर उचकटून काढताना कैद झाले आहेत. या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गातून भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांवर घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बिजली इलेक्ट्रॉनिक्स येथील दुकानाचे शटर लोखंडी रॉडच्या साहाय्याने उचकटले. मात्र, त्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. त्यानंतर भर बाजारपेठेतील रस्त्यासमोरील दुकाने अशाच पद्धतीने फोडण्यास सुरुवात केली. यात व्यापारी संकुलसमोरील न्यू सुरभी स्नॅक्स सेंटरचे शटर उघडून आत प्रवेश केला.

गल्ल्यातील दोन हजारांची रक्कम चोरुन नेली. त्यानंतर कॉम्पलेक्समधील तबरेज बांगी यांच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. बांगी यांचे मसाले, किराणा व कांदे, बटाटे यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे लॉक तोडत शटर उघडून चोरटे आत प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहेत.

मात्र, बांगी यांच्या दुकानात त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली. त्यानंतर अशाच पद्धतीने शहरातील शिरसाट, नार्वेकर, गुडलक बार आदी तीन दुकाने फोडली. तिकडेही त्यांच्या हाती म्हणावे तसे काही लागले नाही.

त्यानंतर नगरपालिकेच्या बाजूलाच न्यू अयंगर बेकरीला लक्ष केले. या दुकानातून दोन हजारांची रक्कम चोरून नेली. पहाटे सफाईसाठी काहीजण आले असता दुकानांचे शटर अर्धवट स्थितीत उघडे होते. त्यांना चोरीचा संशय आल्याने तातडीने दुकानाचे मालक व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलिस मंगेश शिंगाडे यांनी धाव घेत सर्व दुकानांचे पंचनामे केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT