Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

'संजय राऊत पण शरण जाऊ शकले असते...' उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

दैनिक गोमन्तक

ED Arrest Sanjay Raut: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री अटक केली. मात्र, आपण निर्दोष असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांच्या घरी पोहोचून कुटुंबीयांची भेट घेतली. 'भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेलं वक्तव्य देश संपविणार आहे,' असे म्हणत भाजपचा वंश कोणता असा सवाल ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

'संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. मात्र भाजप जे राजकारण करत आहे ते बळाच राजकारण आहे. सुडाचं राजकारण आहे. प्रत्येकाचे दिवस फिरत असतात. भाजपकडे बळ आहे म्हणून आज हे असे वागत आहे. पण हे दिवस जातील. आणि सत्याचे दिवस येतील.' त्याचबरोबर संजय राऊत यांचा गुन्हा काय असा सवाल ठाकरे यांनी केला.

'राजकारणाची घृणा वाटायला लागली आहे. भाजपचं राजकारण घृणास्पद आहे. नड्डाचं वक्तव्य हुकूमशाहीकडे नेणारं आहे. देशातलं राजकारण घृणास्पद होत चाललं आहे. देश कुठे चालला आहे हे डोळे उघडे करून पाहा. पण माझ्यासोबत असणारे आमदार खासदार दमदार आहेत," असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर निशाणा साधला

संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव म्हणाले की, 'देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. विरोधकांना उत्तर द्यायचे आहे. जो कोणी आमच्या विरोधात बोलेल त्याला सांगायलाच पाहिजे की आम्ही काय आहोत? देशात लोकशाहीशी खेळले जात आहे. केंद्रीय यंत्रणांमार्फत आमचा छळ केला जात आहे. भाजपला विरोध करणाऱ्याला तुरुंगात टाकले जात आहे. आणि जो परिस्थितीसमोर नतमस्तक होतो तो शिवसैनिक होऊ शकत नाही,' असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे.

'प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम भाजप करत आहे. मराठी माणसाला चिरडण्याचं काम हा पक्ष करत आहे. विरोधकांना वाट्टेल ते आरोप करून अशा परिस्थितीत अडकवायचं, विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई करायची. असे करून हिंदूमध्ये फूट पाडण्याचं राजकारण भाजप करत असल्याचा' आरोप ठाकरे यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT