Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

आम्हाला कुणीही अक्कल शिकवू नये; संजय राऊतांनी सुनावले

लाऊडस्पीकर वादावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांचे 'मनसे'ला खडे बोल

दैनिक गोमन्तक

मुंबई: मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. '3 मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवा अन्यथा 'मनसे स्टाइल' आंदोलनाला तयार राहा', असा ईशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut slams MNS over loudspeaker issue)

या वादात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'एंट्री' केली आहे. 'मनसे'वर बोचरी टीका करत राऊत म्हणाले, 'आम्हाला लाऊडस्पीकरबाबत कुणीही अक्कल शिकवू नये. बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न चर्चेने सोडवले होते. त्यांनी मौलवींची बैठक घेऊन त्यांची अडचण जाणून घेतली होती. मौलवींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मशिदींमध्ये पुरेशी जागा नसल्याने ते रस्त्यावर नमाज अदा करत होते. यावर तोडगा म्हणून बाळासाहेबांनी त्यांना मशिदींचा अफएसआय वाढवून दिला', असे राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'मी केंद्र सरकारला निवेदन करतो की त्यांनी लाऊडस्पीकरबाबत देखील राष्ट्रीय धोरण आखले पाहिजे. असे केल्यास लाऊडस्पीकरचा प्रश्न पूर्णपणे सुटेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT