Sanjay Raut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेना खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे : संजय राऊत

दैनिक गोमन्तक

काश्मीर खोऱ्यात एकामागून एक हिंदूंच्या वाढत्या टार्गेट किलिंग आणि निर्दयी हत्यांमुळे काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सतत निदर्शने सुरू असून काश्मिरी हिंदूंना जबरदस्तीने स्थलांतरित करण्यास भाग पाडले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, काश्मीर पुन्हा एकदा जळत आहे आणि आमचे सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. (sanjay raut slams central government)

परिस्थिती नियंत्रणाबाहेर
शिवसेना नेते राऊत म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. काश्मिरी पंडित आणि हिंदू समाजासोबतच देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्याही हत्या होत आहेत. काश्मीरचे हजारो पंडित आता आपल्याच देशात सुरक्षित नाहीत. सरकार काय करत आहे?

काश्मिरी पंडितांसोबत महाराष्ट्र सरकार
राऊत म्हणाले, "महाराष्ट्र सरकार काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायनाबद्दल चिंतेत आहे. आमचे सरकार काश्मिरी पंडितांच्या पाठीशी असेल आणि त्यांना शक्य ती मदत करेल.

आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला भेट देणार
राऊत म्हणाले, मी आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला जात आहोत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला भेट देणार आहेत. या यात्रेमागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT