Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut: कोठडीतील दिवसाबद्दल राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut Latest News: जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी सामाज माध्यमांशी संवाद साधला आहे.

दैनिक गोमन्तक

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. शिवसैनिकांमध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले जेलमधले काही अनुभव सांगितले आहेत.

आज सकाळी सामाज माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले, मला वाटलेलं लोक मला विसरतील, पण कालपासून जे स्वागत पाहतोय, त्यावरुन तसं वाटत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, "लोकांना वाटतं, जेलमध्ये राहतो म्हणजे मजेत राहत असेल. पण जगातलं कोणतंही जेल मजा नसते. जेलमध्ये राहणं फार अवघड आहे. माझी तब्येत जेलमध्येही खराब होती, आत्ताही खराब आहे.

तिथे भिंतींशी बोलावं लागतं, एकांतात बोलावं लागतं. मी विचार करायचो की सावरकर 10 वर्षांपेक्षा जास्त कसे राहिले असतील, टिळक कसे राहिले असतील, वाजपेयींपासून अनेक लोक कसे राहिले असतील. पण जे राजकारणात असतात, त्यांना कधी ना कधी जेलमध्ये जावंच लागतं. "

मी सर्व सिस्टिमला किंवा कोणत्याही यंत्रणेला दोष देणार नाही. सरकारने काही निर्णय चांगले घेतलेत, विरोधासाठी विरोध करणार नाही. चांगल्या गोष्टींचं स्वागत केलंच पाहिजे. फडणवीसांनी काही चांगले महत्त्वाचे निर्णय घेतलेत. आता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT