Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

'ईडी भाजपची एटीएम मशीन बनलीयं'

आज मुंबईमध्ये आयकर विभागाकडून धाड सत्र झाले आहे. आम्ही पण एक धाड टाकत आहोत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडी कोठडीत रवानगी झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच गढूळ बनलं आहे. राजकीय पुढारी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. या पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.(Sanjay Raut has criticized the Central Investigation Agency)

संजय राऊत म्हणाले, ''आज मुंबईमध्ये आयकर विभागाकडून धाड सत्र झाले आहे. आम्ही पण एक धाड टाकत आहोत. आयकर विभागाकडून धाडीची भानामती सुरु झाली आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेची निवडणुक होत नाही तोपर्यंत आयकर विभागाकडून धाडी पडतील. आज देशात केवळ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच केंद्रीय यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर मोदी सरकाकडून केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी 75 कंपन्यांची बोगस लिस्ट दिली आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून सुडबुध्दीचं राजकारण केलं जात आहे. देशात सर्वात जास्त ईडीच्या धाडी या महाराष्ट्रात पडल्या आहेत. ईडी आणि ईडीचे काही अधिकारी केंद्र सरकारची एटीएम मशीन बनले आहेत. मोदी सरकारचे स्वच्छ भारत मिशन केवळ कचरा साफ करणे नाही, तर भ्रष्टाचाराचा कचरा साफ करणे हा आहे.''

ते पुढे म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारमधील 14 प्रमुख नेत्यांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्या आणि जितेंद्र नवलानीचा काय संबंध आहे, याचा सोमय्यांनी खुलासा करावा. आम्ही चार ईडी अधिकाऱ्यांसह जिंतेंद्र नवलानीच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच ईडीचे अधिकारी गजाआड जाऊ शकतात. किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट आहेत. विशेष म्हणजे ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT