Sanjay Raut criticizes  Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut criticizes Bhagat Singh Koshyari  Dainik Gomantak
महाराष्ट्र

"राज्यपालांचे अनेक कृत्ये घटनेविरोधी", संजय राऊत यांनी डागली तोफ

दैनिक गोमन्तक

काल नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज्य सरकारचे अधिकार असताना राज्यपाल (Governor) सत्ताकेंद्र असल्यासारखे वागत आहेत तसेच ते मुख्यमंत्री नसून फक्त राज्यपाल आहेत हे ते विसरत आहेत असे सांगत नवाब मालिकांनी विधानसभा गठित झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार दिले जातात असे म्हणत राज्यपालांवर शंका व्यक्त केली होती. आणि आज दिल्लीत शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर तोफ डागली आहे.(Sanjay Raut criticizes Bhagat Singh Koshyari)

राज्यपालांनी कधीही राजकारण करायचं नसते, तसेच राज्यपाल राजकारणासाठी सरकारची अडवणूक करत असल्याचीही जोरदार टीका केली आहे. देशात अनेक राज्यपाल आपले काम व्यवस्थित करतात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल राज्याची अडवणूक करतात आणि त्यांचे वागणे चुकीचे असल्याचे म्हणत, भाजपशासीत अनेक राज्यात पूर आले मात्र तिथले राज्यपाल तर कधी पाहणी करण्यासाठी गेले नाहीत मग महाराष्ट्राच्या राज्यपालांचा दौरा नेमका कशासाठी असा सवाल संजय राऊत यांनी राज्यपालांनी केलेल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणीदौरयावर उपस्थित केला आहे. आणि हे कृत्य घटने विरोधी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कुणीही करू नका असे सांगत जर सरकारचे पाय खेचाल तर पायात अडकून पडाल असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

त्याचबरोबर दिल्लीत काल विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात अधिकच जवळीक पाहायला मिळाली,राहुल गांधींनी संजय राऊत यांच्या खांद्यांवर हात टाकलेला एक फोटो व्हायरल झाला त्यावरही त्यांनी सुचक वक्तव्य केले आहे. "आम्ही राज्यात एकत्र सरकार चालवत आहोत, हातातला आत खांद्यावर आला इतकाच फरक."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

देशवासीयांना आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

SCROLL FOR NEXT