Sambhaji Chhatrapati Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sambhaji Chhatrapati:...तर उठाव होणारच, संभाजीराजेंनी दिला राज्यपाल हटाओचा नारा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांवरून सरकारवरला धारेवर धरले असून, उठाव करण्याचा इशारा दिला आहे.

Pramod Yadav

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यात पडसाद उमटले. या विधानावरून शिवसेना, राष्ट्रवादी यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी देखील राज्यपालांवर टीका केली. दरम्यान, पुन्हा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांवरून सरकारवरला धारेवर धरले असून, उठाव करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर, संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र लिहून राज्यपालांना पदावरून हटवण्याची विनंती केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूषांबद्दल अवमानकारक विधाने करणारे भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे. असे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले होते.

दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपती यांनी यावरून राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

"भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!" #कोश्यारी_हटाओ

असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर निशान साधत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. असे म्हटले होते. शनिवारी चिखली येथे झालेल्या जाहीर सभेत संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राची एक इंच देखील जमीन आम्ही कुणाला देणार नाही, यासाठी महाभारतासारखी लढाई झाली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत असे संजय राऊत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT