Konkan Railway Memu Special Train Dainik Gomantak
महाराष्ट्र

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

Konkan Railway Memu Special Train: गणपती उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

गणपती उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात गणपतीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पुन्हा मुंबई, ठाणे, पुण्यातील लोकांना परतताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर चिपळूण – पनवेल – चिपळूण या मार्गावर अतिरिक्त अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या गाड्या ५, ६ आणि ७ सप्टेंबर २०२५ रोजी धावतील. ट्रेन क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल.

तर ट्रेन क्रमांक ०११५९ पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन पनवेलहून दुपारी ४:४० वाजता सुटून रात्री ९:५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.

'या' स्थानकांवर थांबणार गाड्या

या विशेष गाड्या अंजनी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवांखावती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्थानकांवर या गाड्या थांबतील.

गाडीच्या रचनेत एकूण आठ मेमू कोच असतील. अचूक वेळापत्रक व थांब्यांची अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गणपती उत्सवाच्या काळात कोकणात हजारो भाविक दाखल होतात. त्यांचा परतीचा प्रवास अधिक सुकर व सोयीस्कर व्हावा, यासाठी रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

SCROLL FOR NEXT