Anil Deshmukh
Anil Deshmukh  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची जप्त केलेली संपत्ती परत करा; सर्वोच्च न्यायालयाचा 'ईडी'ला आदेश

दैनिक गोमन्तक

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने ईडीला अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत देण्याचे आदेश दिले आहेत. (Return confiscated property of Anil Deshmukh; Supreme Court orders ED)

राष्ट्रवादीच्या (NCP) पुण्यातील नेत्या रुपाती पाटील यांनी याबबात फेसबुक पोस्ट माहिती दिली आहे. ईडी अनिल देशमुख यांची 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीने (ED) देशमुख यांच्या 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये त्यांच्या काही घरांचा आणि कार्यालयांचा देखील समावेश आहे.

न्यायालयाने ईडीला फटकारले असून त्यांच्या सर्व मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देशमुख यांचे वकील विद्युत अग्रवाल यांनी दिली आहे. निलंबित पोलिस (Police) अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे 'टार्गेट' दिल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील देशमुखांवर गंभीर आरोप केले होते.

या सर्व प्रकरणांची चौकशी करत ईडीने देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर देशमुख यांनना अटक करण्यात आली होती. या धाडी दरम्यान ईडीने देशमुखांच्या 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. 180 दिवसानंतर ईडीने ही कारवाई केली होती. कायदानुसार 180 दिवसानंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 180 दिवसानंतर मालमत्ता जप्त केल्याप्रकरणी ईडीला फटकारलं असून अनिल देशमुख यांचे पुत्र आणि सूनेताही मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT