Retired Union Home Secretary Madhav Godbole Dainik Gomantak
महाराष्ट्र

निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन

निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (Retired Union Home Secretary Madhav Godbole) यांचं आज निधन झालं आहे.

दैनिक गोमन्तक

निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (Retired Union Home Secretary Madhav Godbole) यांचं आज निधन झालं आहे. पुण्यामध्ये (Pune) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने माधव गोडबोले यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा आहेत. (Retired Union Home Secretary Madhav Godbole has passed away in Pune)

दरम्यान, डॉ. गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील (America) प्रसिध्द विल्यम्स महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएचडी ची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर 1959 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च 1993 मध्ये भारत सरकारच्या गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्त घेतली.

शिवाय, त्यांनी भारत सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं. या आधी माधव गोडबोले महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या प्रशासनामध्ये मुख्य वित्तसचिव पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांनी राज्याच्या राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्याचबरोबर गोडबोले यांनी मनिला मधील (Manila) आशियाई विकास बॅंकेत पाच वर्षे कामही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT