कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू

कोकणातला माणूस जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आगमाच्यावेळी घरी येतोच.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : श्रावण मासापासून (Shravan Maas) पारंपारीक सणसमारंभाला (Festivals) सुरवात होते. आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या लोकांना मात्र या सणांना मुकाव लागत. पण कोकणातला (Konkan) माणूस जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आगमाच्यावेळी घरी येतोच. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर (Ganpati Festival) कोरोनाचे (Covid-19) सावट आहे. यावर्षीही बाप्पांचं आगमन साध्या पध्दतीनेच करावं लागणार आहे. असे असले तरीही सणोत्सवाला घरी जाण्याची ओढ मात्र कायमच असते. (Reservation for Ganpati special trains on Konkan railway line started)

तेव्हा गणेश चतुर्थी निमित्त घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने विशेष (Ganpati special trains Konkan railway) गाड्या सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्रीय व पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने 7 सप्टेंबर पासून दरदिवशी कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल रेल्‍वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. या रेल्वेतून प्रवास जाण्यासाठी आरक्षण सुरू झाले आहे.

गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी रोड - मुंबई स्पेशल, सावंतवाडी रोड - पनवेल स्पेशल स्पेशल, मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक स्पेशल, कुडाळ - लोकमान्य टिळक स्पेशल, कुडाळ- पनवेल स्पेशल, कुडाळ- पनवेल स्पेशल, करमळी - पुणे जंक्शन स्पेशल, मडगाव जंक्शन - पनवेल स्पेशल या कोकण रेल्वे मार्गावर 7 स्पटेंबर पासून सोडल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रियेला 7 ऑगस्‍टपासून सुरवात झाली आहे.

सुरतकल - मुंबई सेंट्रल विकली स्पेशल, मडगाव जंक्शन - मुंबई सेंट्रल विकली स्पेशल, मडगाव-वांद्रे विकली स्पेशल, कुडाळ- वांद्रे विकली स्पेशल, मडगाव जंक्शन - वांद्रे विकली स्पेशल, मडगाव - पाटणा विकली सुपरफास्ट स्पेशल, कुडाळ- अमदाबाद विकली स्पेशल, कुडाळ - विश्वामित्री विकली या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी 11 ऑगस्ट पासून आरक्षणाला सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT