Mahesh Muralidhar Kale
Mahesh Muralidhar Kale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amaravati: महेश राव आता घरीच बसा, Insta reel करणाऱ्या कॉन्स्टेबलवर कारवाई

Manish Jadhav

राज्यात कोरोनाचं सावट असताना दुसरीकडे जनतेच्या रक्षकांची एक वेगळीच कथा समोर आली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यामधील चांदूरबाजार येथील पोलिस कर्मचारी महेश मुरलीधर काळे (Mahesh Muralidhar Kale) यांनी खाकी वर्दीत असताना हातामध्ये पिस्तूल घेत व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला या व्हिडिओमुळे तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. वर्दीचा आणि शस्राचा गैर वापर केल्याने बेशिस्त आणि बेजबाबदारपणे केलेल्या वर्तनाबद्दल काळे यांच्यावर अमरावती ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हरी बालाजी (Superintendent of Police Hari Balaji) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि काल संध्याकाळी पोलिस अधिक्षकांनी ही कारवाई केली.

चांदूरबाजार येथील पोलिस कर्मचारी महेश काळे यांनी शासकीय वर्दी मध्ये हातामध्ये पिस्तूलसारख्या शत्राचा वापर करुन व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल शेअर केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करताच प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.

स्वतःला सिंघम समजून हातामध्ये पिस्तूल घेऊन स्टंट करण्याच्या नादामध्ये महेश काळेला मोठी किंमत मोजावी लागली. हा व्हिडिओ व्हायरल होताच अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यांनी या कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली. एवढ्यावरच न थांबता अमरावती जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तुमच्या अधिनस्त असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची अशी कृत्ये यापुढे खपवून घेता येणार नाहीत. सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा आहे. अगदी लहान सहान गोष्टी लपता लपत नाहीत. त्यामुळे अधिक्षकांनी आपल्या अधिनस्त पोलिस कर्मचाऱ्यांना सज्जड दम भरला आहे.

नेमंक व्हिडिओमध्ये आहे तरी काय

अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही येत असाल तर दादागिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊं.. अमरावती जिल्ह्यामध्ये जो कायदा राहणार तोच सर्वांच्या फायद्याचा राहणार आहे. कायद्याचा बालेकिल्ला अर्थात अमरावती जिल्हा.. असं पोलिस कर्मचारी महेश काळे याने आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट करताना काळे पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत. सोबतच त्यांच्याजवळ पिस्तूल देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हा व्हिडिओ पोस्ट होताच या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. आणि हेच कारण महेश यांच्या कारवाईचं ठरलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT