Konkan Beach Bulls Fight Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video: कोकणातल्या किनाऱ्यावर बैलांची झुंज, अर्धा तास रंगलेला 'रणसंग्राम' सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

Konkan Beach Bulls Fight Viral Video: कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे ठरतात. मात्र याच समुद्रकिनाऱ्यावर घडलेला एक दुर्मिळ आणि थक्क करणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

Ratnagiri Ganpatipule Beach Bulls Fight Viral Video

रत्नागिरी : कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे ठरतात. मात्र याच समुद्रकिनाऱ्यावर घडलेला एक दुर्मिळ आणि थक्क करणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दोन बैल जवळपास अर्धा तास लाटांमध्ये भिडलेले दिसले. या अनोख्या झुंजीचा व्हिडिओ स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर टाकला आणि क्षणातच तो चर्चेचा विषय ठरला.

सामान्यतः बैलजोड्यांच्या झुंजी रस्त्यावर किंवा शेतात पाहायला मिळतात, पण थेट समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये दोन बैलांची आमने-सामने भिडंत ही सर्वांसाठीच अविश्वसनीय बाब ठरली. समुद्रकिनारा पावसाळ्यामुळे पर्यटकांसाठी बंद असतानाच अचानक अशी झुंज सुरू झाली आणि किनाऱ्यावर उपस्थित ग्रामस्थही थक्क झाले.

जवळपास अर्धा तास ही झुंज सुरू राहिल्यानंतर ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून बैलांना पिटाळून लावले. अखेरीस ही झुंज थांबवण्यात आली. आम्ही लहानपणापासून बैलांच्या झुंजी पाहत आलोय, पण समुद्रात अशी झुंज पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. हे दृश्य खरोखरच थरारक होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिलीय.

सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून पर्यटकांपासून सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत सर्वांमध्येच या दुर्मिळ प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे. रस्त्यावर नव्हे तर थेट समुद्रात झालेल्या या बैलांच्या झुंजीने कोकणातील लोकांचे आणि देशभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT