Rare fossils
Rare fossils  
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आढळले समुद्र स्ट्रोमाटॉलाइटसारखे दुर्मीळ जीवाश्म

दैनिक गोमंतक

महाराष्ट्र - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधील वणी शहरा जवळील एका ग्रामीण भागात अतिप्राचीन काळात समुद्रात तयार होणारे विविध काळातील चूनखडक आढळतात. या चुनखडकात 200  ते 150 कोटी वर्षाच्या निओ - प्रोटोरोझोईक (Neo - Proterozoic) काळात इथे असलेल्या समुद्रात (Sea) पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्टेरीया (stromatolite) या सूक्ष्म जीवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. (Rare fossils like sea stromatolite found in Maharashtra)

चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही दुर्मिळ जीवाश्म शोधून काढली आहेत. पृथ्वीची उत्पत्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली आहे. तरीदेखील  सजीवांची उत्पत्ति 3  ते 4 अब्ज वर्षा दरम्यान झालेली आहे. संपूर्ण जगात मोजक्याच ठिकाणी असे जीवाश्म आढळले आहेत. त्यांना स्ट्रोमाटोलाईट (Stromatolite) असे म्हणतात. ह्या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया (Cyanobacteria) असे देखील म्हटल्या जाते. 

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ प्रोटेरोझोईक (Nioproterozoic)काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे 
आढळतात. समुद्राच्या पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू निर्माण झाले आहेत. ही जिवाणू पृथ्वीवरील पहिले विकसित झालेले जीव आहेत. हे सर्व आदीजीवाणू खनिजे खाऊन ती जगत होती. पुढे अश्याच जीवांपासून बहुपेशीय जीव निर्माण होत गेले आहेत. मासे, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनासोर तसेच पुढे मानवजीव अशा प्रकारे सजीवांची निर्मिती झाली आहे. 

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली आहेत. या सजीवांना शास्त्रिय भाषेत
कुकोकल्स (Chroococales) व ओकटोरीअल्स (Oschilatorials) असे म्हणटले जाते. या प्रकारची जीवाश्मे चिखलामध्ये गोल आकाराची गुंडाळी करून एकत्रितपणे राहतात. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आहे. समुद्रातील चीखलांचे रुपांतर चुनखडकात झाले असून जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले आहे. करोडो वर्षानंतरसुद्धा  चुनखडकातील सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट आढळून येतात. प्रा. सुरेश चोपणे नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करत असतात.

दरम्यान,  रशियामध्ये हे मायक्रोस्कोपिक जॉम्बी जीव आहेत, जे आपल्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या पाण्याच्या ठिकाणी 50 दशलक्ष वर्षांपासून आढळतात. जिथून त्यांला जीवाला काढले गेले आहे तेथे अत्यंत थंड आणि सर्वत्र बर्फाळ वातावरण आहे. मात्र, या प्राण्यांच्या शरीरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याला डेलॉइड रोटीफर्स(Bdelloid Rotifers) किंवा व्हील एनिमल(Wheel Animals) म्हणतात. हे अनेक पेशीं असलेले सूक्ष्म जीव आहेत. त्यांच्या तोंडाजवळ केसांचा गुच्छा राहतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हिमयुगाच्या काळात, सामान्यत: स्वच्छ पाण्यात राहणारे हे प्राणी पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT