मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणेंनी (Narayan Rane) जे वक्तव्य केले त्यातून वाद झाला. बोलण्याच्या भरात ते बोलून गेले असतील. मुख्यमंत्री हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्या पदावरील व्यक्तीबाबत बोलताना संयम बाळगणे गरजेचे (Patience is needed) आहे. पण मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव विसरतात हे वेगळ्या प्रकारे सांगू शकतो. पण सरकार ज्या प्रकारे वागत आहे, भाजप राणेंच्या त्या वक्तव्याचे समर्थनकरत नाही. पण भाजप (BJP) पूर्ण ताकदीनिशी राणेंच्या पाठीशी उभी राहील. शर्गील उस्मानी (Shargil Osmani) भारत विरोधात वक्तव्य करतो. त्याला अटक करण्याची हिंमत यांची नाही. असे टोला भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
फडणवीस म्हणाले, पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का त्यांनी त्याप्रकारे पत्र लिहीले आहे. त्या पत्रातील भाषा चूकीची आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाबाबत मला आदर आहे. पण सध्या सरकारने बस म्हणल्यावर पोलीस लोटांगण घालत आहेत. प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चपराकीनंतर देखील हे सुरु आहे ते योग्य नाही. पोलिसांना माझा सल्ला आहे, कायद्याने काम करावे. राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण सरकार ज्या पध्दतीने पोलिसांचा गैरवापर करत आहेत ते योग्य नाही. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केलात तर खबरदार उद्या आमच्या कार्यालयावर हल्ला केल्यास आम्ही शांत बसणार नाही, कायद्याचे राज्य असावे. जन अशिर्वाद यात्रा थांबणार नाहीत. आमची यात्रा रोखण्यासाठी ४० एफआयआर दाखल केले आहेत. यात्रा सुरु राहील या गोष्टी लोकशाहीत योग्य नाही. या ठिकाणी जी कारवाई सुरु आहे ती अयोग्य आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा. असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
तुम्ही कोणी असो कारवाई तर होणारच : संजय राऊत
तुम्ही केंद्रीय मंत्री असो किंवा बादशाह असो तुमच्यावर कारवाई तर होणारच. राणे ज्या शाळेत शिकले ती शाळा अजूनही अबाधित आहे. राणेंची ही भाषा अशोभनीय आहे. तुम्हाला कोण विचारतंय असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
नियमानुसार कारवाई करु : पुणे पोलीस आयुक्त
रोहित कदम यांच्या तक्रारी वरुन चतृश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा तपास सुरु आहे. पुढील कारवाई नियमानुसार केली जाईल. पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.