Rana Jail  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याला जेल की बेल फैसला सोमवारी

शिवसेना - भाजप यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात काही दिवसांत हनुमान चालिसा म्हणण्यासाठीे आपण मातोश्रीवर जाणार असं भाष्य राणा दाम्पत्याने केल्याने कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं कारण देत पोलीसांनी त्यांनी ताब्यात घेतले होते. यावर आज सुनावणी पार पडली. यावर राणा दाम्पत्याचा निकाल न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला जेल होणार की बेल याचा फैसला सोमवारी होणार आहे. (The Rana couple's verdict will be announced on Monday )

न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पार्श्वभूमीवर आज आज सुनावणी पार पडली आहे. यावेळी राज्य सरकारने राणा दाम्पत्याच्या जामिनाला कडाडून विरोध केला आहे. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय. दुसरीकडे नवनीत राणा यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात यावं अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केलीय. राणा यांना नीट अन्न आणि उपचार मिळत नसल्याचा दावा वकिलांनी केलाय.

सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. खरंतर राणा दाम्पत्याच्या माध्यमातून भाजप महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधत असल्याचं शिवसेनेने म्हटलय. तर भाजपने महाविकास आघाडी विरोधकांचा आवाज दाबत आहे. अशा आशयाचं वक्तव्य भाजप नेते करताना दिसत आहेत. आणि या साऱ्या आरोप - प्रत्यारोपाच्या फेऱ्यांमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न हे मागे पडले आहेत. हे मात्र निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT