ramdas athawale loud speaker in maharashtra masjid raj thackeray
ramdas athawale loud speaker in maharashtra masjid raj thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

लाऊडस्पीकर वादात रामदास आठवलेंची उडी, म्हणाले- आमचा पक्ष मशिदींचे रक्षण करेल

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरवरून वाद सुरू झाला आहे. या सगळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर मशिदीतील लाऊडस्पीकर हटवायला कोणी आले तर त्यांचा पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असेही ते म्हणाले. (ramdas athawale loud speaker in maharashtra masjid raj thackeray)

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आंबेडकर संस्कार भवनाच्या उद्घाटन समारंभाला रामदास आठवले आले होते. येथे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मी नरेंद्र मोदींसोबत आहे, माझा पक्ष भाजपसोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. लाऊडस्पीकर काढण्याबद्दल बोलू नका. जर तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. तुम्ही तुमच्या मंदिरात लाऊडस्पीकर लावू शकता. हनुमान चालिसाचे पठण करू शकता. मात्र नवे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

लाऊडस्पीकरचा मुद्दा यूपीपासून महाराष्ट्रापर्यंत

आजकाल यूपीपासून महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरचा मुद्दा गाजत आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींमधून 3 मेपर्यंत लाऊडस्पीकर हटवावेत, असा अल्टिमेटम दिला होता. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही तर मनसे कार्यकर्ते राज्यभरातील मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील, असे ते म्हणाले होते.

इतकेच नाही तर धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींतील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे, असे ट्विट राज ठाकरेंनी केले होते, असे राज ठाकरे म्हणाले होते. "दुर्दैवाने महाराष्ट्रात योगी नाहीत.

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवले

यूपीमध्ये आतापर्यंत 21 हजार 963 लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवरून हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर 42332 धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या मोहिमेसंदर्भात आतापर्यंत 29808 धर्मगुरूंशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे चालवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

SCROLL FOR NEXT