Raju shetty Dainik Gomantak
महाराष्ट्र

''राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय ?''

गेवराई येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी राजु शेट्टींचा संतप्त सवाल

दैनिक गोमन्तक

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. ऊस जात नसल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त असुन यापैकी नामदेव जाधव रा. हिंगनगाव ता. गेवराई या 35 वर्षीय शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून त्याच फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Raju Shetty's question to the state government regarding farmer suicide )

मृत जाधव शेतकरी यांना दोन एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतात 265 जातीचा ऊस लावलेला आहे. ऊस लागवडीसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला. मे महिन्याचा दुसरा आठवडा आलेला असताना ऊस जात नसल्याने जाधव हे नैराश्येत राहत असे. कारखानदारांकडे अनेक वेळा चकरा मारूनही त्यांचा ऊस गाळप होत नसल्याने त्यांनी आज सकाळी उसाचा फड पेटवत त्याच फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी सरकारला खडा सवाल करत पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय ? सवाल करत जगाचा पोशींदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कोण वाली आहे का ? अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे.

यावेळी “ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य शासन जबाबदार आहे , असा आरोप शेट्टी केला. तसेच मृत शेतकरी यांच्या आत्महत्येला जबाबदार असणारे अधिकारी, मुकादम, ऊसतोडणी मशीन चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

वास्तविक मराठवाड्यामध्ये यंदा अतिरिक्त ऊस आहे. याची शासनाला कल्पना होती. सक्षम साखर कारखान्यांकडे अतिरिक्त ऊस गाळपासाठी दिला असता तर अतिरिक्त ऊसाची समस्या निर्माण झाली नसती. त्यातून जाधव सारख्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. या आत्महत्येस राज्य शासन जबाबदार आहे. असं ही शेट्टी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT