Rajinikanth Dainik Gomantak
महाराष्ट्र

Rajinikanth: मातोश्रीवर थलायवा रजनीकांतची एंट्री! सोशल मिडियावर फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले…

रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबीयांची मुंबईत भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

Rajinikanth Latest News: टॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

रजनीकांत शुक्रवारी मुंबईत आले होते. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर रजनीकांत यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मातोश्रीवर पुन्हा एकदा रजनीकांतजींना भेटून खूप आनंद झाला.'

या फोटोंमध्ये (Photo) उद्धव ठाकरेंसोबतच त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, त्यांची दोन्ही मुलं आदित्य आणि तेजसही दिसत आहेत. यावेळी रजनीकांत यांना एक पुष्पगुच्छही देण्यात आला होता.

या फोटोमध्ये मागे शिवसेनेचे सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही राजकीय बैठक नव्हती. रजनीकांत यांचे मुंबईत येणे झाल्याने त्यांनी ही भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध खूप चांगले आहे असे बोलले जाते. जेव्हा रजनीकांत काही कामानिमित्ताने मुंबईत (Mumbai) येतात, तेव्हा ते मातोश्रीवर जातात आणि ठाकरे कुटुंबाची भेट घेतात.

अभिनेते रजनीकांत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे चाहते आहेत, असेही म्हटले जाते. आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘मातोश्रीची ताकद’. तर, आणखी एकाने लिहिले की, 'सुपर-डुपर.' दुसऱ्या एकाने 'मातोश्रीवर थलायवा' असे लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT