Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

'जेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाला तेव्हा...'

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या तमाम मनसैनिकांना पाहून मी भारावून गेलो आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण आज उत्साहात साजरा केला जात आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवतीर्थावरुन राज ठाकरे मनसैनिकांना कोणता संदेश देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. त्याचबरोबर राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवाया आणि मोदी सरकारचे धोरणावरही राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे म्हणाले, ''महारष्ट्रातील तमान जनतेला गुढीपाडव्याच्या खूप खूप सुभेच्छा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या तमाम मनसैनिकांना पाहून मी भारावून गेलो आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा मेळावा घेता आला नाही. लॉकडाऊनचा काळ आठवला की, थक्क व्हायला होतं. कोरोनाच्या दहशतीमुळे संपूर्ण जग सामसुम झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात एकही माणूस बाहेर फिरताना दिसत नव्हता. परंतु याच लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने पोलिसांनी जीवावर उधार होऊन सेवा बजावली. याच काळात डॉक्टर आपल्याला देवदूतासारखे वाटू लागले. मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असताना पुन्हा एकदा बाजारपेठा गजबजायला लागल्या आहेत.''

त्यानंतर ते पुढे म्हणाले, ''लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरात आसल्यामुळे काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या आहेत. 2019 ची विधानसभा निवडणूक एकदा तुम्ही आठवा. याच निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस लढले. परंतु निकालानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं दिवास्वप्न आठवलं आणि भाजपपासून फारकत घेतली. जेव्हा भाजपला सरकार स्थापन करण्यात अडचण आली तेव्हा शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी गठबंधन करत सत्तेचा मेवा खाल्ला. ज्या मतदारांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान केलं होतं त्याचा मात्र शिवसेनेला विसर पडला. देशातील एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला जातो, याच प्रकरणात एक पोलिस अधिकारी कोठडीत जातो आणि मुंबईच्या पोलिस कमीश्नरची उचलबांगडी होते किती विदारक आहे.''

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्था राखरांगोळी केली. याच ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याच्या प्रकरणात कोठडीत जातात, तेव्हा कोठडीत जाताना मलिक जनतेला ठेंगा दाखवून जातात. लोकशाही कशी असते ते इंग्लंडकडून शिका. ज्या विस्टन चर्चील यांनी दुसऱ्या महायुध्दात इंग्लंडला विजयी केले त्याच चर्चील यांचा इंग्लंडमधील जनतेनं निवडणुकीनंतर पराभव केला. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील शेतकरी, एसटी महामंडळाचा कर्मचारी, युवक, पोलिस, विद्यार्थी ठाकरे सरकारवर नाखूष आहेत. राज्यात अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तसेच देशातील प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे या मताचा मी आहे.''

राज ठाकरे म्हणाले, ''नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांकडे लक्ष देण्याचा आवाहन केलं होतं. मात्र आता उत्तरप्रदेशमध्ये विकास होतोय हे ऐकूण बरं वाटलं. जेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस जन्म झाला, तेव्हा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरु झालं. ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा विढा उचलला तेव्हा त्यांनी कोणत्याही मावळ्याची जात पाहीली नव्हती. महाराजांनी आपल्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने गुढी उभारली होती. परंतु आज राजकीय पुढारी आपल्याला जाती-पातीच्या राजकारणात अडकवत चालले आहेत. देशातील प्रत्येक राज्य एकमेकांना ओरबाडण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेचजण विकासाच्या नावावर भांडत आहेत.''

ठाकरे म्हणाले, ''1985 नंतर मुंबईमध्ये लोकांचे लोंढेच्या लोंढे आले. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. दुसरीकडे मात्र राज्यात मागील काही दिवसांपासून आमदारांच्या घराचा मुद्दा चांगलाचं गाजत आहे. आमदारांच्या घरांना पहिल्यांदा विरोध महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या आमदाराने केला. ज्या प्रकारचा बकालपणा महाराष्ट्रासह मुंबईत वाढत आहे, त्यास केवळ आणि केवळ राज्यातील सत्ताधीशचं जबाबदार आहेत. परंतु मतांचा मेवा खाण्यासाठी हेच सत्ताधीश झोपडपट्ट्या वाढवत आहेत. मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे या सरकारला उतरावेच लागतील. नाहीतर त्याच मशिदीसमोर स्पीकर लागतील आणि मोठ-मोठ्याने हनुमान चालीसाचं पठन केलं जाईल. मला आरे ला कारे करणारी लोक हवेत. जेव्हा मुंबई बिल्डरांच्या घशात घातली जात होती, तेव्हा तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्यासाठी जागा भेटली नाही हे आश्चर्यकारक आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "बेघर गोवेकरांना शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी" आमदार वीरेश बोरकर

Operation Mahadev: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा! 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत 3 दहशतवादी ढेर, त्यापैकी एक पहलगाम हल्ल्यातील संशयित?

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT