राजकारणावरून मी राज ठाकरे यांना कधीही सल्ला दिला नाही: शर्मिला ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडणार आहे.

Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष वेधल गेलं आहे. याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला तसेच त्यांच्या राज ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत हेही यावेळी विचारण्यात आलं. यावर शर्मिला ठाकरे यांनी मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ला देत नाही, असं थेट उत्तर दिलं आहे. (I never advised Raj Thackeray on politics Sharmila Thackeray)


Raj Thackeray
जखमांवर मिरच्या शिंपडू नका, शरद पवारांच्या वक्तव्यावर 'हा' चित्रपट निर्माता संतप्त

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “मी कधीच राज ठाकरे यांना राजठाकरेंबद्दल काहीच सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा राजकारणातील त्यांना खूप काही कळतं. त्यांना लोकांचे प्रश्न अडचणी जास्त माहिती असतात. त्यामुळे ते सर्वांबद्दलचं काहीतरी बोलतील. अमितला देखील मी आई म्हणून सल्ले देत नाही, माझ्यापेक्षा त्यांना राजकारणातील जास्त कळतं, अमितचे वडील म्हणून राज ठाकरे त्याला काही सूचना देतील.”

“आम्हाला सभेच्या गर्दीची केव्हाच काळजी नसते”

“राज ठाकरे यांची सभा कायमच रेकॉर्ड ब्रेक राहिली आहे. आम्हाला गर्दीची काळजी आहे. उलट करोना काळात बघितलं तर त्यांनी जिथं जिथं शाखा उद्घाटन केलं तेथे निर्बंध असूनही धक्काबुक्की होईल अशी गर्दी कायम पहायला मिळाली आहे. त्यामुळे सभेला गर्दीची आम्हाला काळजी केव्हाही नाही,” असंही शर्मिला ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.


Raj Thackeray
Aryan Khan Case: प्रभाकर साईलच्या मृत्यूची होणार चौकशी, गृहमंत्र्यांनी दिले आदेश

“शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ द्या”

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “आजच्या आनंदाचे कारण असे आहे की आज महाराष्ट्रावरील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. करोनामुक्त महाराष्ट्र झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचं आयुष्य हे रोगराईमुक्त जावो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बंद होऊन त्यांना सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळू दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ देत, त्यांना वीज मोफत मिळू दे. सगळ्यांना ‘जो जे वांछिल तो तेलावो’ अशी मी देवाकडे प्रार्थना करते.”

“मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिलंय”

“मागील 2 वर्षे महाराष्ट्रानेच नाही तर जगाने फार हालाखित दिवस काढले आहेत. तसे दिवस परत कुणाच्याही वाट्याला नये. आज आम्हाला आमचे सर्व सैनिक भेटत आहेत याचा परमानंद आनंद आहे. आम्ही 2 वर्षांनी भेटतो आहोत. त्यामुळे आणखीच उत्साह आहे. मी दरवर्षी पेढे आणि बर्फी वाटत असते. मला वाटतं आपण गोड खाऊन आपला दिवस गोड करतो, पण पोलिसांसह हे लोक दिवस रात्र 8 ते 16 तास काम करत आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा गोड दिलं पाहिजे. मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिल आहे,” असं शर्मिला ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com