Raj Thackeray
Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

उगाच कशाला पावसात भिजत बसायचं म्हणत, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

दैनिक गोमन्तक

Raj Thackeray Pune Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मोठ्या सभेला संबोधित केले. औरंगाबादनंतरची त्यांची ही दुसरी रॅली आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा का रद्द केला हे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असते. (Raj Thackeray in Pune)

भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला -

राज ठाकरे यांना पुण्यातील अनेक मैदनांनी सभा घेण्यासाठी नकार दिला, पावसाचे वातावरण असल्याने ही सभा मैदानावर न घेता सभागृहात घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शेवटी ही सभा गणेश कला क्रीडा सभागृहात घेण्यात आली. यावेळी," सभांना हॉल परवडत नाही, SP कॉलेज ने हॉल नाकारला तेव्हा आम्हाला नाही तर कुणालाच नाही," असे म्हणत सभेसाठी हॉल ला नकार देणाऱ्यांना पण एक टोला ठाकरे यांनी लगावला. आणि महत्वाचं म्हणजे, "निवडणुका नाही काही नाही उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं," असे म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवारांवर टिकास्त्र सोडलं.

अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं

आजच्या रॅलीला 10,000-15,000 लोक उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आज अयोध्या दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली, अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केल्याचा आरोप ठाकरे यांनी आजच्या सभेत केला आहे.

काय पोरकटपणा लावलाय?

राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना खरे आणि खोटे हिंदुत्व काय ते शिवसेना ठरवणार असल्याचे सांगितले. 'राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात दोन आठवडे मोठा राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेह-लदाखमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. हे दृश्य बघून शिवसैनिकांना काय वाटल असेल? काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात,' असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यालाही राज ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Supreme Court: ‘PM मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला’, सर्वोच्च न्यायालयात याचिका; वाचा नेमंक प्रकरण?

Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

Sanguem News : सांगेत मुख्य रस्त्यावरील गटारांची सफाई गरजेची

SCROLL FOR NEXT