raj thackeray convoy accident near aurangabad seven to eight cars damaged
raj thackeray convoy accident near aurangabad seven to eight cars damaged Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, दिग्गज मराठी कलाकार थोडक्यात बचावले

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघात झालेल्या गाड्यांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगावजवळ झाला असून या अपघातातील जखमींची माहिती अद्याप मिळालेली नाही. या अपघातात ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या असून त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे आणि कलाकार अंकुश चौधरी यांच्या गाड्याचं नुकसान झालं आहे. (raj thackeray convoy accident near aurangabad seven to eight cars damaged)

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या मर्सिडीज गाडीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने अकुंश चौधरी आणि केदार शिंदे या अपघातातून बचावले आहेत. दोन्ही दिग्गज कलाकार हे सुखरुप आहेत.

राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. त्याआधी शुक्रवारी ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. आज सकाळी पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते औरंगाबादकडे रवाना झाले. तत्पूर्वी वाटतेच त्यांनी वढू तुळापूरला जाऊन संभाजीराजेंच्या समाधी स्थळावर माथा टेकवला. त्यांच्या थोर कार्याचं स्मरण केलं. संभाजीराजेंच्या विचारांचा जयघोष केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Flood In Kenya: मुसळधार पावसामुळे केनियात 'हाहाकार', 42 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT