Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raj Thackeray: फडणवीस म्हणजे फळ्यावर लिहिणारे! राज ठाकरेंनी सांगितला अर्थ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागात चित्रपट काढणार असल्याची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Raj Thackeray: मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी रविवारी 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवाजी महाराज, चित्रपट आणि राजकारणावर मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी फडणवीस या शब्दाचा अर्थही सांगितले. फड म्हणजे फळा आणि फळ्यावर लिहिणारे म्हणजे फडणवीस, असा अर्थ राज ठाकरे यांनी सांगितला.

दरम्यान, शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागात चित्रपट काढणार असल्याची माहितीही, राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे म्हणाले, फडणवीस, चिटणीस, पारसवीस याचा अर्थ काय? नवीस म्हणजे लिहिणारा. पर्शियन लिहीणारा पारसवीस, चिठ्ठी लिहीणारा चिटणीस. फड म्हणजे फळा.. फळ्यावर लिहिणारे फडणवीस असा अर्थ राज ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितला. 1681 ला औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि येथेच मेला. तो हुशार होता. 27 वर्षे तो परत आग्र्याला गेलाच नाही. शिवाजी मला अजून छळतो, असे तो म्हणायचा. त्याच्यासोबत सर्वजण लढताहेत, या प्रेरणेला तो 'शिवाजी' असे तो म्हणतो. शिवाजी नावाचा विचार मारायला औरंगजेब महाराष्ट्रात आला होता.

राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे अफझल खानाचा वध आणि वेगवेगळ्या लढाया यांच्यापलीकडले आहे. शिवचरित्रातील केवळ चार ते पाच प्रसंगात अडकायला नको. चित्रपट बनवणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

कॉलेजमध्ये होतो तेव्हा प्लाझाला गांधी चित्रपट लागला होता. असा भव्य चित्रपट शिवाजी महाराजांवर यायला हवा, असे तेव्हा वाटले होते. त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. नंतर लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे.

आता मात्र मी शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागात चित्रपट आणत आहे, त्यावर आत्ताच मी बोलणार नाही. पण ते काम झाल्यावर सर्वांसमोर आणणार आहे. महाराष्ट्रात किंवा देशात सध्या ओरबारडणे सुरू आहे आणि रयतेला त्रास होता कामा नये हा शिवरायांचा विचार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT