Pune to Goa bus caught fire today Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुण्याहून गोव्याकडे जाणारी बस जळून खाक

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सने आज पहाटे अचानक पेट घेतला

दैनिक गोमन्तक

पुण्याहून (Pune) गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सने आज पहाटे अचानक पेट घेतला यामध्ये ही बसगाडी जळून खाक झाली आहे. ही घटना आज गुरुवारी पहाटे 4 वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी जवळ घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात खळबळ उडाली. या ट्रॅव्हल्समधील 37 प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले. तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए 03/डब्लू 2518) ही बस पहाटे पुण्याहून गोव्याच्या (Goa) दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव जवळ या बसला अचानक आग लागली. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस त्वरीत थांबवली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ बाहेर येऊ लागले आणि बसने मोठा पेट घेतला.

या घटनेची माहिती नजीकच्या पोलिस स्टेशनला मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची चौकशी केली. यावेळी महामार्ग विभागाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी येवून आग विझवली. या घटनेनंतर वैभववाडी एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि लोकांची गर्दी जमली होती. सकाळी सात वाजता अडकलेली सर्व वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT