Raj Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यात मनसेच्या बुरुजाला धक्का

शहराध्यक्ष वसंत मोरे नाराज मुस्लीम कार्यकर्त्यांच्या भेटीला, पक्षात संभ्रमाचं वातावरण

दैनिक गोमन्तक

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरुन केलेल्या वक्तव्याचा वाद काही शमताना दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील जातीयवादाच्या घुसखोरीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत पुण्यातील शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. आता पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध दर्शवत मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्टही केली आहे जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान आपल्या वार्डात मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचं पालन करता येणार नसल्याचं पुणे (Pune) मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पक्षांतर्गत विरोध वाढू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर मनसेमध्ये (MNS) वैयक्तिक भूमिकेला स्थान नसल्याचं सांगत राज ठाकरेंचा शब्दच अंतिम असल्याचा पलटवार मनसे सरचिटणीस आणि माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत अजूनही पक्षात संभ्रम असून दोन गट पडल्याचे चित्र आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यादिवशी शिवाजी पार्कावर केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांवर टीका केली होती. आपला प्रार्थनेला विरोध नाही, मात्र मशिदीवरील भोंग्यांमुळे आम्हाला त्रास होतो. धर्मांध नसलो तरी आम्ही धर्माभिमानी आहोत. त्यामुळे मशिदीवरील भोंगे काढून टाका अन्यथा मशिदीसमोर तेवढ्याच मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT