Koyata Gang Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video : कोयता गँगला पोलिसांनी दाखवला खाकीचा इंगा, 'भाई'ला भर रस्त्यात बेदम चोप

Koyata Gang Viral Video : पुणे शहरात कोयता टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

पुणे शहरात कोयता टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण हातात धारदार कोयता घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. दोन्ही हल्लेखोरांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान केले, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्रास दिला.

28 डिसेंबर रोजी सिंहगड लॉ कॉलेज रोडवर चाकू आणि धारदार शस्त्रांसह दोन तरुणांनी दुकानात घुसून लोकांना धमकावून जखमी केले होते. यासोबतच चोरटे धारदार शस्त्रांचा धाक दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना घाबरवत होते.

हल्ल्यात एक पादचारी जखमी

कोयता टोळीने केलेल्या या दहशतीच्या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र एक हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला, तर पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये दुसऱ्याला धडा शिकवला आणि त्याला अटक केली.

इथे पाहा हा व्हिडिओ :

हा बदमाश अल्पवयीन आहे. त्याचबरोबर अन्य आरोपीचे नाव करण दळवी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

कोयता टोळीची दहशत सातत्याने वाढत आहे

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोयता टोळीची दहशत सातत्याने वाढत आहे. हडपसर परिसरात सुरुवातीला कोयता टोळीची दहशत होती. मात्र आता या टोळीने शहरासह आसपासच्या गावातही धुमाकूळ घातला आहे. त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: अभिनवचा धडाका, पण गोवा पराभूत; टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशचा सहा विकेटने विजय

Bicholim: डिचोलीत 'ऑपरेशन सिंदूर'वर उलगडला शौर्याचा इतिहास, शांतादुर्गा विद्यालयातील कला; प्रदर्शनाला कलाप्रेमींचा प्रतिसाद

Margao: सीट बेल्ट, हेल्मेट वापरासाठी 'गोवा कॅन'चे जागृती अभियान; 50 विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांचा सहभाग

Imran Khan: इम्रान यांच्याबाबत संशयाचे धुके, मृत्यू झाल्याची चर्चा; अधिकृत स्पष्टीकरण नाही

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! उपकरणांच्या उत्पादनाला बळ, दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाला मंजुरी

SCROLL FOR NEXT